शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणास साडेआठ लाखांचा गंडा | पुढारी

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तरुणास साडेआठ लाखांचा गंडा

जळगाव : शेअर बाजारात गुंतवणूक करून जास्तीचा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून रावेर तालुक्यातील एका तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे. सायबर चोरट्याने या तरुणास तब्बल साडेआठ लाखांचा गंडा घातला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील विवरे येथील शेख निसार शेख वजीर (वय 26, रा. आझादनगर) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यानुसार यांच्या मोबाईलवर मेघा, गजेंद्र आणि मयंक तिवारी यांनी फोन करून व्यवसाय शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळणार असल्याचे सांगितले. तिघांनी ‘व्हाया ट्रेड’ या बनावट कंपनीच्या माध्यमातून शेख यांना दुप्पटीचा नफा मिळवून देण्याचे अमिष देत वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने 8 लाख 21 हजार रुपये उकळले.

शेख निसार शेख वजीर यांनी या आमिषाला बळी पडून पैसे गुंतविले. मात्र ठरल्याप्रमाणे मोबदला मिळाला नाही. तसेच पैसेही परत न दिल्याने शेख वजीर यांनी दिलेल्या पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार संशयित मेघा, गजेंद्र व मयंक तिवारी या तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुढील तपास निरीक्षक बी. डी. जगताप करीत आहेत.

हेही वाचा ;

Back to top button