आश्वी : विहिरीतील हिस्स्यास नकार दिल्याने मारहाण | पुढारी

आश्वी : विहिरीतील हिस्स्यास नकार दिल्याने मारहाण

आश्वी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : एका भावाकडे दुसर्‍या भावाने सामाईक विहीरीचा हिस्सा मागितला. तर दुसर्‍या भावाने विहीर माझ्या क्षेत्रात आहे, हिस्सा मिळणार नाही, असे म्हटल्याचा राग आल्याने दोन्ही भावामध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाल्याने एकाच कुटूंबातील 4 जण जखमी झाले. ही घटना संगमनेर तालुक्यातील खळी येथे घडली. यावरून आश्वी पोलीस ठाण्यात 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत माहिती अशी, खळी येथील गोरक्षनाथ किसन कांगणे हे आपल्या गट नं 447 या क्षेत्रातील गोठयाजवळ काम करताना सुभाष मुरलीधर कांगणे व बाबासाहेब किसन कांगणे हे समुहाने येत गट नं 447 क्षेत्रातील असणार्‍या विहीरीत हिस्सा मागितला.

हे क्षेत्र माझे असल्याने विहीरीत हिस्सा मिळणार असे म्हटल्यांचा राग आल्याने गोरक्षनाथ कांगणे यांच्यासह पत्नी ताराबाई, मुलगा विशाल व चैतन्य यांना शिवीगाळ व दमबाजी केली. तर प्रकाश विठ्ठल कांगणे यांने गंजाने पायाव, सागर कांगणे याने डोक्यात काठीने गोरक्षनाथ यांना मारहाण करत जखमी केले. तसेच सुभाष कांगणे यांनी गोरक्षनाथ यांना जमिनीवर पाडून मारहाण केली.

मारहाण करत असल्यांने पत्नी व मुलांनी आरडा -ओरड केल्याने बाबासाहेब कांगणे यांनी ताराबाई यांच्या डोक्यात गंज मारला तर विशाल व चैतन्य यांना रामदास कांगणे यांने दगड मारुन व दिलीप कांगणे व सागर कांगणे यांनी लाथाबुक्यांनी मारत जखमी केले. तसेच जर आमच्यावर पोलिस केस केली तर एक – एकाचा बेत बघू असे दमबाजी करुन शिवीगाळ केली. या भांडणात गोरक्षनाथ कांगणे, पत्नी ताराबाई, मुलगा विशाल व चैतन्य हे जखमी झाले. याबाबत गोरक्षनाथ कांगणे यांच्या जवाबावरून आश्वी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास आश्वी पोलीस करत आहे.

हेही वाचा

पुणे-नगर महामार्गावर पाण्याची डबकी

कोल्हार : सप्ताहाचा काला हे ऐक्याचे प्रतीक : रामगिरी

Nashik : भगूर व दारणा परिसरात बिबट्याची दहशत

Back to top button