नाशिकच्या सायली वाणीची महाराष्ट्र टेबल टेनिस संघात निवड | पुढारी

नाशिकच्या सायली वाणीची महाराष्ट्र टेबल टेनिस संघात निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोपाळ येथे होणाऱ्या ६६ व्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकची सायली वाणी हिची १९ वर्षांखालील मुलींच्या महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

सायलीच्या बरोबर महाराष्ट्र संघात पृथा वर्टीकर (पुणे), अबोली कुलकर्णी (पुणे), अनुष्का पाटील (मुंबई) व सिया भोसले (मुंबई) यांचाही समावेश आहे. या स्पर्धा दि. १० ते १३ जून या कालावधीत होणार आहेत. सायलीने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अनेक पदके पटकावली आहेत. १५ वर्षांखालील मुलींच्या गटाचेही राष्ट्रीय विजेतेपद तिने पटकावले आहे. पोर्तुगाल २०२१ मध्ये झालेल्या जागतिक यूथ स्पर्धेत तिने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. तेथे भारतीय संघाने कांस्यपदक पटकावले. २०२२ मधे अँटालिया येथे झालेल्या डब्ल्यू टी टी यूथ कंडेन्डेर स्पर्धेतही तिने कांस्यपदक पटकावले. खेलो इंडिया स्पर्धेतही तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष शेखर भंडारी, मिलिंद कचोळे, सचिव राजेश भरवीरकर, कोषाध्यक्ष अभिषेक छाजेड, जय मोडक (कोच), संजय वसंत, सतीश पटेल, अलीअसगर आदमजी, अलका कुलकर्णी आदींनी सायलीचे कौतुक केले.

हेेही वाचा:

Back to top button