नाशिक : मुलाच्या विरहाने आईचेही निधन | पुढारी

नाशिक : मुलाच्या विरहाने आईचेही निधन

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील पूर्व भागातील निर्‍हाळे फत्तेपूर येथे बुधवारी (दि. 31) सकाळी सांगळे कुटुंबातील नवी मुंबई येथे मुलाचे निधन झाल्याची वार्ता समजताच आईला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिचे निधन झाले. आई व मुलगा यांचा नैसर्गिक मृत्यू होऊन एकाच वेळी अंत्यविधी होण्याची घटना गावासह पंचक्रोशीत प्रथमतच घडल्याने नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट हळहळ व्यक्त करीत आहेत.

निर्‍हाळे फत्तेपूर येथील भूमिपुत्र व सध्या नवी मुंबई येथील रहिवासी शिवराम फकीरबा सांगळे (63) अधीक्षक शिक्षण निरीक्षक विभाग मुंबई या सेवेतून चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. काही दिवसांपासून ते पॅरेलेसीसच्या आजाराने त्रस्त असताना बुधवारी सकाळी 7.30 वाजता निधन झाले. फत्तेपूर निर्‍हाळे येथे अंत्यविधी होणार होता. त्यामुळे सांगळे यांचे पार्थिव घेऊन नातेवाईक गावाकडे निघाले होते. त्यांची आई ठकूबाई या मुळातच सर्वात लहान मुलगा प्रदीप (पांडुरंग) महाराज यांच्या हृदयविकाराच्या धक्क्याने झालेल्या निधनातून सावरलेल्या नव्हत्या. त्यामुळे मुलगा, सून, नातवंडे व नातेवाईक यांनी ठकूबाई यांना सांगळे यांचे पार्थिव सिन्नरपर्यंत येईपर्यंत कुठलीही माहिती दिली नव्हती. पण घराकडे न येणारे नातेवाईक येऊ लागले, अन् काही रडूही लागल्याने मुलाच्या निधनाची चाहूल लागली. आणि हंबरडा फोडत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आई ठकूबाई फकिरा सांगळे (95) यांना आल्याने त्यांचा जागीच त्यांचा मृत्यु झाला. शिवराम यांना दोन मुले, पत्नी, भाऊ, भावजया, नातवंडे, पुतणे, सुना असा परिवार आहे.

आई व मुलाला एकाचवेळी अग्निडाग
निर्‍हाळे स्मशानभूमीवर मुलगा शिवरामच्या अंत्यविधीची तयार सुरू असताना नातेवाइकांवर त्याच्या आईच्या अत्यंविधीचीही वेळ आली. आई व मुलगा यांची घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेमुळे नातेवाईक व ग्रामस्थ यांच्यावर शोकाकुल वातावरण पसरले होते. अखेर जाम नदीवरील स्मशानभूमीत आई व मुलाला एकाच वेळी अग्निडाग देण्यात आला. ही परिसरातील पहिलीच घटना असल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू येत होते.

हेही वाचा:

Back to top button