जळगाव : पाचोऱ्यात कॉम्प्युटर्स दुकानाला आग; लाखोंचे नुकसान | पुढारी

जळगाव : पाचोऱ्यात कॉम्प्युटर्स दुकानाला आग; लाखोंचे नुकसान

जळगाव :पुढारी वृत्तसेवा

पाचोरा शहरातील साई कॉम्प्यूटर्स दुकानाला अचानक आग लागली. या घटनेत दुकानातील ७ ते ८ लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील उमेश राऊत यांच्या मालकिचे साई कॉम्प्युटर्स येथे दुपारी १ ते १.४५ वाजेच्या सुमारास आग लागल्याने या दुकानातील संगणक, लॅपटॉप प्रिंटर, व इतर पेरिफेरलस यांचे साहित्य, फर्निचर, एसी, आगीत जळून अंदाजित ७ ते ८ लाख रुपयांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे. नागरीक व व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांच्या सहकार्याने तत्काळ आग विझविण्यास मदत केली. त्यामुळे आग आटोक्यात येऊन मोठे नुकसान टळले आहे.

हेही वाचा:

Back to top button