पिंपळनेर : प्रथम अंगणवाडी पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड | पुढारी

पिंपळनेर : प्रथम अंगणवाडी पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
साक्री येथील देशातील प्रथम अंगणवाडी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात सर्व नवनिर्वाचित संचालकांची सभा बोलविण्यात आली. यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोन्ही पदासाठ एकमेच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.बी.सुर्वे यांनी अध्यक्षपदी संगीता तोरवणे व उपाध्यक्षपदासाठी दिपाली भामरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

पतसंस्थेत एकूण १३ महिला संचालकापैकी ५ महिला संचालक उच्चशिक्षित आहेत. देशातील प्रथमच अंगणवाडी पतसंस्था असल्याने संस्थापक प्रा. नरेंद्र तोरवणे यांच्या नेतृत्वाखाली विकास पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक सलग ५ वेळा बिनविरोध झाली आहे. निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. बी. सुर्वे यांनी कामकाज पाहिले. पतसंस्थेला (आय.एस.ओ) मानांकन मिळाले असून थकबाकी देखील शून्य आहे. इतकेच नव्हे तर येथील अंगणवाडी पतसंस्थेतील अंगणवाडी सेविकेच्या मुलाला प्रदेशात शिक्षणासाठी कर्ज देण्यास अनेक बँकांनी नकार दिला होता. त्या अंगणवाडी सेविकेच्या मुलाला शिक्षणासाठी सुमारे १५ लाख रुपये कर्ज देऊन मुलाला परदेशात पाठवणारी एकमेव पतसंस्था आहे. पतसंस्थेच्या निवडणुकीत १३ महिला बिनविरोध निवडणूक आल्या असून यामध्ये पदवीधर महिला उमेदवारांची संख्या ४ आहे तर संगणक इंजिनिअर पदवीधारक एक महिला आहे. यावेळी निवडणूकीचा जल्लोष पेरेजपूर रस्त्यावरील भव्य दिव्य अंगणवाडी कार्यालयात साजरा करण्यात आला. अंगणवाडी पतसंस्थेचे वैशाली पंखेवाले (बेनुस्कर), इंदुबाई गायकवाड, भीमाबाई चौरे, मनीषा पाटील, शोभा देसले, अर्चना इंगळे, संगीता गर्दे, अनुबाई बर्डे, मनीषा पाटील, फुलवंती गवळी, महिला बाल विकास प्रकल्पाच्या संध्या बोरसे, उज्वल अग्निहोत्री, चैताली दीक्षित, शिवाजी राठोड यांसह सर्व महिला भगीनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button