Nashik Lasalgaon : ‘लव्ह जिहाद’ विरोधात लासलगावात विराट हिंदू मूक मोर्चा | पुढारी

Nashik Lasalgaon : 'लव्ह जिहाद' विरोधात लासलगावात विराट हिंदू मूक मोर्चा

नाशिक : (लासलगाव) वार्ताहर 

लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा संपूर्ण देशात लागू करावा व गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी (दि. ३) विराट हिंदू मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी सकाळी ११ वाजता लासलगाव (Nashik Lasalgaon) येथील बाबा अमरनाथ मंदिर ते शिवाजी चौक असा हा मोर्चा काढण्यात आला.  नागरिकांसह महिलांनी भगवी टोपी परिधान करत या मोर्चात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

लव्ह जिहाद विरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने विविध संस्था आणि ग्रुप आक्रमक होत शनिवारी लासलगाव शहरातील मेनरोडसह गाव भागातील रस्त्यावरून हा विराट मूक मोर्चा काढण्यात आला. हा मूक मोर्चा बाबा अमरनाथ मंदिरापासून शिवाजी चौकापर्यंत काढण्यात आला. यात मोठ्या संख्येने हिंदू बांधव व भगिनी सहभागी झाल्या होत्या. पोलीस अधिकारी आणि महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांना निवेदन देत धर्मांतर बंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा व गोवंश हत्या बंदी कायदाची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करत श्रद्धा वालकर या भगिनीचा मारेकरी आफताब या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

दिल्ली येथील श्रद्धा वालकर खून प्रकरणानंतर लव्ह जिहादविरोधात  देशभरात संतापाची लाट उसळली आहे. लव्ह जिहादच्या नावे मुलींवर धार्मिक, शारीरिक अत्याचार होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे राज्यात हिंदू संघटनांनी एकत्रित येऊन मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. मोर्चात विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लासलगाव पोलिसांनीही चोख बंदोबस्ताचे नियोजन केले होते.

हेही वाचा :

Back to top button