भारत-म्यानमार सीमेवरून इंडोनेशियन सुपारीची तस्करी! ईडीचे १७ ठिकाणी छापे | पुढारी

भारत-म्यानमार सीमेवरून इंडोनेशियन सुपारीची तस्करी! ईडीचे १७ ठिकाणी छापे

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपूर येथे पीएमएलए अंतर्गत ईडीने आज (दि.३) छापा टाकून सुमारे 11.5 कोटी रुपयांची 289.57 मेट्रिक टन इंडोनेशियन सुपारी जप्त केली. भारत-म्यानमार सीमेवरून भारतात या सुपारीची तस्करी केली जात होती. या कारवाईत ईडीने 16.5 लाख रुपये रोख, विविध कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.

मुंबई आणि नागपूरमधील इंडोनेशियन सुपारीच्या तस्करी संबंधीत 17 ठिकाणी ईडीने आज छापे टाकले. इंडोनेशियात सुपारी कमी दरात मिळते. याचा फायदा घेत तेथून ती प्रामुख्याने भारत-म्यानमार सीमेवरून बेकायदा भारतात आणली जाते. यासंबंधीत इंडोनेशियन सुपारीचे पुरवठादार, कमिशन एजंट, लॉजिस्टिक प्रदाते, वाहतूकदार, हवाला ऑपरेटर आणि खरेदीदार यांचे एक सुसंघटित सिंडिकेट असल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे. ईडीकडून छाप्यात नागपूर येथे सुमारे 11.5 कोटी रुपयांची 289.57 मेट्रिक टन बेहिशेबी सुपारी जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button