धुळे : पिस्तुलाचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार ; संशयित आरोपीला अटक
धुळे, पुढारी वृत्तसेवा : पिस्तुलाचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार केल्या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रशेखर पाटील असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेवरून अफवा पसरवून कायदा आणि सुव्यवस्था खराब करू नये, असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर पाटील याने विवाहितेला पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पीडितेने तिच्या नातेवाईकांना सांगितला.आझाद नगर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी चंद्रशेखर पाटील याला अटक केली असून त्याने वापरलेले पिस्तूल देखील जप्त केले आहे. दरम्यान, या घटनेमुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा :