

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गर्दीच्या वेळी महिलांना पीएमपी बसमधून प्रवास करताना प्रचंड त्रास होतो. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने महिलांकरिता आता 19 मार्गांवर ज्यादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार (दि. 28) पासून या ज्यादा गाड्या शहरातील गर्दीच्या मार्गावर फक्त महिलांकरिता धावतील. महिलांना बसमधून सुरक्षित प्रवास करता यावा, याकरिता दै.'पुढारी'मध्ये यापूर्वी अनेक वृत्ते प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याची दखल घेत अखेर पीएमपी प्रशासनाने महिलांसाठी 19 मार्गांवर बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना सुरक्षितपणे प्रवास करणे सोपे होणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आता पीएमपीच्या 24 बस ही सेवा पुरवतील.
1) स्वारगेट ते येवलेवाडी
2) स्वारगेट ते हडपसर
3) अ.ब.चौक ते सांगवी
4) मनपा भवन ते लोहगाव
5) कोथरूड डेपो ते विश्रांतवाडी
6) कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड
7) कात्रज ते कोथरूड डेपो
8) हडपसर ते वारजे-माळवाडी
9) भेकराईनगर ते मनपा भवन
10) हडपसर ते वाघोली (केसनंद)
11) अप्पर डेपो ते स्वारगेट
12) अप्पर डेपो ते पुणे स्टेशन
13) पुणे स्टेशन ते लोहगाव
14) मनपा भवन ते आकुर्डी रेल्वे स्टेशन
15) निगडी ते पुणे स्टेशन (औंधमार्गे)
16) निगडी ते भोसरी
17) निगडी ते हिंजवडी माण फेज 3
18) चिंचवडगाव ते भोसरी
19) चिखली ते डांगे चौक
पीएमपीकडून सोमवारपासून (दि.28) पुणे स्टेशन ते डिफेन्स कॉलनी (गंगाधाम-मार्केट यार्ड) ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार मार्ग क्र. 170 वर संचलनात असलेल्या सकाळी एका बसला व सायंकाळी एका बसला पुणे स्टेशन ते डिफेन्स कॉलनी (गंगाधाम-मार्केट यार्ड) फेर्या वाढवून देण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.
ही बस पुणे स्टेशन, कलेक्टर कचेरी, जी.पी.ओ., बॉम्बे गॅरेज, जुना पुलगेट, महात्मा गांधी स्टॅण्ड, मिलिटरी हॉस्पिटल वानवडी, वानवडी बाजार, शिंदे छत्री, नेताजीनगर, लुल्लानगर (मार्केट यार्ड रोड), माउंट कार्मेल स्कूल, डिफेन्स कॉलनी (गंगाधाम मार्केट यार्ड) अशी धावेल, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.