नाशिक : आत्महत्या करू की, जमीन विकून पैसे भरू? जिल्हाधिकार्‍यांना शेतकर्‍याचा सवाल | पुढारी

नाशिक : आत्महत्या करू की, जमीन विकून पैसे भरू? जिल्हाधिकार्‍यांना शेतकर्‍याचा सवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा, यासाठी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी पैशांची मागणी केल्याची तक्रारच एका शेतकर्‍याने निवेदनाद्वारे थेट जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांच्याकडे केली आहे.

आपली परिस्थिती नसून आत्महत्या करू का जमीन विक्री करून पैसे भरू, असा प्रश्नच सदर शेतकर्‍याने जिल्हाधिकार्‍यांना केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गौण खनिज विभागाच्या कारवायांवरून गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय चर्चेत आले आहे. त्यातच आता शेतकर्‍याने अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांच्याविरोधात थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे. दत्तात्रय आणि प्रभाकर पिंगळे असे दाद मागणारे शेतकरी आहेत. पिंगळे यांची रासेगाव (ता. दिंडोरी) येथे शेती आहे. शेतीत पाण्याची सोयीसाठी शेततळे तयार करणे व त्यातून निघणारे गौण खनिज विकून त्याच्या मोबदल्यात जमीनीची लेव्हल केली. हे सर्व करताना रितसर रॉयल्टीदेखील प्रशासनाकडे भरल्याचे पिंगळे यांनी पत्रात म्हटले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी तहसीलदारांना पत्र देत गट नंबर 345 मधून जे काही गौणखनिज निघेल ते सर्व सरकारी रस्त्याचे कामाला वापरण्यात येईल. तसेच गौण खनिजाची रॉयल्टीही ठेकेदाराच्या बिलातून कपात करून शासनास जमा करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार कायदेशीर म्हणणे मांडून पुरावे दिले असताना फाईल बंद करण्यासाठी अडवणूक करत पैशांची मागणी केल्याची तक्रार संबंधित शेतकर्‍याने केली.

हेही वाचा :

Back to top button