अनधिकृत बांधकामावर हातोडा; कात्रजमध्ये महापालिकेची सात हजार चौरस फुटांवर कारवाई | पुढारी

अनधिकृत बांधकामावर हातोडा; कात्रजमध्ये महापालिकेची सात हजार चौरस फुटांवर कारवाई

कात्रज; पुढारी वृत्तसेवा: नियम डावलून सुरू असलेल्या कात्रज येथील तीन बांधकामांवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने धडक कारवाई केली. यात सात हजार चौरस फुटांवरील बांधकामे पाडली आहेत.  परिसरात महापालिका कार्यक्षेत्रात परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम केले जात होते. हे निदर्शनास आल्यानंतर संबंधित मालकाला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, तरीही बांधकाम सुरूच ठेवल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे उपअभियंता प्रताप धायगुडे यांनी सांगितले

कात्रज, शिवशंभोनगर गल्ली नंबर 2, राजस सोसायटी व गुजर-निंबाळकरवाडी रोड येथील तीन ठिकाणी चार ब्रोकर आणि दोन गॅस कटर व दोन जेसीबीच्या साहाय्याने सात हजार चौरस फूट क्षेत्रावर कारवाई करीत अवैध बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका बांधकाम विकास विभाग झोन दोनच्या वतीने शहर अभियंता प्रशांत वाघमारे व अधीक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शखाली कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे व उपअभियंता प्रताप धायगुडे यांच्या नियंत्रणाखाली शाखा अभियंता प्रशांत मोरे, हेमंत कोळेकर, अभिजित भुजबळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

नव्या जॉब कटरने होणार कारवाई
कात्रज भागात अनधिकृत बांधकामांवर महापालिककेने नवीन जॉब कटर मशिन खरेदी केले असून, यापुढे मोठ्या इमारती व बांधकामे यावर जॉब कटर मशिनने कारवाई करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे यांनी सांगितले.

महापालिका कार्यक्षेत्रात नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करू नयेत आहेत. अशा बांधकामांवर यापुढे नियमितपणे ही कारवाई सुरू राहणार आहे.

                                                  प्रताप धायगुडे, उपअभियंता बांधकाम विभाग.

 

Back to top button