नाशिक : घरफोड्यांचा सिलसिला कायम; कानडी मळ्यातून दागिने, रोकड लंपास | पुढारी

नाशिक : घरफोड्यांचा सिलसिला कायम; कानडी मळ्यातून दागिने, रोकड लंपास

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
येथील कानडी मळा परिसरात भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना घडली.

नीलेश सुदास सोनवणे (30) व त्यांची पत्नी मजुरी व्यवसाय करतात. ते व त्यांची दोन मुले असा चार जणांचे कुटुंब आहे. मुले सकाळी शाळेत गेल्यानंतर सोनवणे दाम्पत्य सकाळी 11.30 वाजता घराला कुलूप लावून मजुरी कामासाठी सिन्नरमध्ये गेले होते. त्यानंतर ते थेट सायंकाळी 5 वाजता घरी आले. घरी आल्यानंतर त्यांना घराचा पुढील दरवाजाचा कडीकोयंडा तोडलेला दिसला. घरात प्रवेश केला असता सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाटात बघितले असता त्यातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 3 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 4 ग्रॅम वजनाचे कानातले झुबे व 9 हजारांची रोकड असा एकूण 1 लाखांचा ऐवज लंंपास झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर सोनवणे यांनी तत्काळ सिन्नर पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करून सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक राहुल निरगुडे पुढील तपास करत आहेत. घरफोड्यांचा सिलसिला सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीती आहे.

हेही वाचा:

Back to top button