औरंगाबाद : विरोधात साक्ष दिली, म्हणून कटरने वार | पुढारी

औरंगाबाद : विरोधात साक्ष दिली, म्हणून कटरने वार

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : ‘खुनाच्या गुन्ह्यात तू आमच्याविरुद्ध साक्ष देतो का?’ अशी धमकी देत तिघांनी 20 वर्षीय तरुणाला मारहाण केली. तसेच, त्याच्यावर कटरने वार केले. पाठ व पोटावर आठ ते दहा वार करण्यात आले आहेत. हा प्रकार 22 ऑगस्टच्या रात्री साडेनऊ वाजता हडको, पवननगर येथील पायोनियर शाळेजवळ घडला.

या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल भोसले (रा. एसटी कॉलनी, जाधववाडी) हा जखमी आहे.ऋत्विक जैन (रा. मयूरपार्क) अभी आणि एक अनोळखीचा आरोपींमध्ये समावेश आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी मयूरपार्क येथे यश महेंद्रकर याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात विशाल भोसले हा महत्त्वाचा साक्षीदार आहे. 22 ऑगस्टला विशाल हा हडकोतील पवननगर येथील पायोनियर शाळेजवळ बदाम शेक आणण्यासाठी गेला होता. तेव्हा आरोपी ऋत्विक जैन व त्याच्या दोन साथीदारांनी त्याला गाठले.

ऋत्विक हा ओळखीचा असल्याने तो त्याच्याशी बोलू लागला. तेव्हाच ‘तू आमच्याविरुद्ध कोर्टात साक्ष दिली तर आम्ही तुला ठार मारू,’ अशी धमकी दिली. त्याला शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर ऋत्विक जैनने कटरने विशाल भोसलेच्या पोट व पाठीवर वार केले. तो रक्तबंबाळ झाल्यावर तिन्ही आरोपी तेथून पळून गेले. त्यावर विशाल भोसलेने त्याचा मित्र सतीश गायकवाडला बोलावून घेतले. त्यांनी सिडको ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली

Back to top button