नांदूरमध्यमेश्वरला दूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत | पुढारी

नांदूरमध्यमेश्वरला दूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर धरणात दूषित पाण्यामुळे शेकडो मासे मृत झाले आहेत. रसायनयुक्त पाण्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने मासे मृत झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात 270 पेक्षा अधिक जातींच्या पक्ष्यांचे दर्शन होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जलचर प्राणी राहत असल्याने या दूषित पाण्यामुळे त्यांनादेखील धोका निर्माण झाला आहे. तसेच लासलगावसह 16 गावांमध्ये पाणीपुरवठा योजना असल्याने या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. रसायनयुक्त पाणी धरण क्षेत्रात गेले कसे, असा प्रश्न आता निर्माण झाला. याच धरणातून लासलगावसह 16 गावांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. नागरिक हे पाणी सांडपाणी आणि पिण्यासाठीदेखील वापरतात. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचादेखील प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा :

Back to top button