वांबोरीत वीजचोरी करणार्‍या दोघांवर गुन्हा | पुढारी

वांबोरीत वीजचोरी करणार्‍या दोघांवर गुन्हा

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : वीज बील कमी येण्यासाठी वीज मीटरमध्ये छेडछाड करून विजेची चोरी करण्यात आली. हा प्रकार राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडली. वीजचोरी करणार्‍या दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल केला.

दिनांक 9 जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास यातील दोन आरोपींनी महावितरण कंपनीच्या वीज मीटरमध्ये वीज वापरायची नोंद मीटरमध्ये कमी करून वीजचोरी केल्याने उघडकीस आले.

प्रदीप सावंत यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत नवनाथ भानुदास कल्हापुरे व भाऊसाहेब भानुदास कल्हापुरे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button