

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर १४ एप्रिलरोजी गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी विशेष मोका न्यायालयाने २ संशयित आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला राजस्थानमधून मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. Salman Khan residence firing
सलमान खानच्या घरासमोर १४ एप्रिलरोजी काही अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोळीबार केला होता. या प्रकरणानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांनी २४ तासांत तपासाची सूत्रे वेगाने फिरवून अनेक संशयितांना अटक केली होती. आत्तापर्यंत ४ संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती, यामधील एकाने कोठडीत असतानाच गळफास घेत जीवन संपवले. आणखी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. Salman Khan residence firing
मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणातील पाचवा आरोपी मोहम्मद चौधरी याला राजस्थानामधून नुकतिच अटक केली आहे. त्याने सागर पाल आणि विक्की गुप्ता या दोन नेमबाजांना पैसे पुरवण्यात आणि रेकी करण्यात मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. चौधरी याला मुंबईत आणण्यात आले असून, त्याला न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी करण्यात येणार आहे, असे देखील मुंबई गुन्हे शाखेने स्पष्ट केल्याचे वृत्तात म्हटले होते.
हेही वाचा