Sidharth-Kiara : पुन्हा रोमान्स करताना दिसणार सिद्धार्थ-कियारा | पुढारी

Sidharth-Kiara : पुन्हा रोमान्स करताना दिसणार सिद्धार्थ-कियारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘शेरशाह’ चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Sidharth-Kiara) यांना एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांना त्यांची जोडी खूप आवडली. चित्रपटापासून दोघांच्या नात्याची चर्चा जोरात सुरू आहे. मधल्या काळात त्यांच्या ब्रेकअपची बरीच चर्चा झाली आणि मग बातमी आली की त्यांचे पुन्हा पॅचअप झालं आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान कियारा अडवाणी सिद्धार्थ मल्होत्राचे कौतुक करताना दिसली. आता चाहत्यांचा आनंद आणखी वाढणार आहे. कारण शेरशाह चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे. (Sidharth-Kiara)

शेरशाह या चित्रपटात दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. यानंतर खऱ्या आयुष्यातही त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडली. हे दोघेही एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार, दोघेही एका रोमँटिक चित्रपटात दिसणार आहेत. दोघांनीही चित्रपटाची स्क्रिप्ट पाहिली असून दोघांनाही ती आवडली आहे. बाकी फक्त दोघांवर सही करायची आहे. जर सर्व काही सुरळीत झाले तर लवकरच हे दोघे पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

नुकतेच कियाराचे दोन चित्रपट आले आहेत आणि दोन्ही बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहेत. भूलभुलैया-२ ने ब्लॉकबस्टर कमाई केली आहे. त्याचवेळी वरुण धवनसोबतचा ‘जुग जुग जियो’ या चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

Back to top button