सॅम पित्रोदांच्‍या वादग्रस्‍त विधानांवर काँग्रेसने ‘हात’ झटकले

सॅम पित्रोदांच्‍या वादग्रस्‍त विधानांवर काँग्रेसने ‘हात’ झटकले

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ईशान्य भारतातील लोक चिनीसारखे दिसतात. दक्षिण भारतीय हे आफ्रिकन लोकांसारखे आहेत आणि उत्तर भारतीय काहीसे गोरे आहेत, असे वादग्रस्‍त विधान काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी केल्‍याने देशभरातून त्‍यांच्‍यावर टीकेची झोड उडाली आहे. आता काँग्रेस पक्षानेही त्‍यांच्‍या विधानापासून फारकत घेतली आहे. संपर्क प्रधारी जयराम रमेश यांनी या प्रकरणी पक्षाची भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.

अत्यंत दुर्दैवी आणि अस्वीकार्य : जयराम रमेश

जयराम रमेश यांनी सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म X हँडलवर म्‍हटलं आहे की, " सॅम पित्रोदा यांनी भारताच्या विविधतेचे वर्णन करण्यासाठी देशातील लोकांचे कलेले वर्णन अत्यंत दुर्दैवी आणि अस्वीकार्य आहेत. या विधानापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वतःला पूर्णपणे वेगळे करते."

काय म्‍हणाले होते सॅम पित्रोदा ?

सॅम पित्रोदांनी एका माध्‍यम समुहाशी बोलताना भारतीयांच्या दिसण्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. ते म्हणाले की, ईशान्य भारतातील लोक चिनीसारखे दिसतात. दक्षिण भारतीय हे आफ्रिकन लोकांसारखे आहेत. तर उत्तर भारतीय काहीसे गोरे आहेत. आतापर्यंत जशी विविधतेत एकता आहे तशीच आपण टिकवून ठेवू शकतो.

'भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला आपण एकत्र ठेवू शकतो. पूर्व भारतातील लोक चीनसारखे दिसतात. पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक गोरे दिसतात आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात. काही फरक पडत नाही. आपण सर्व एक भावा-बहिणी आहोत. भारतातील लोक भाषिक, धार्मिक आणि खाद्य विविधतेचा आदर करतात, जी प्रत्येक प्रदेशानुसार बदलते. माझा फक्त या भारतावर विश्वास आहे. जिथे प्रत्‍येक नागरिकासाठी स्‍थान आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने जीवन जगण्याची संधी मिळते. भारताच्या लोकशाही, स्वातंत्र्य आणि उदारतेच्या कल्पनेला आज राम मंदिरामुळे आव्हान दिले जात आहे, असा दावाही त्‍यांनी केला.
पंतप्रधान अनेकदा केवळ मंदिरांना भेट देतात. ते केवळ राष्ट्रीय नेत्यासारखे बोलत नाहीत तर भाजपच्या नेत्याप्रमाणे चर्चाही करतात, अशी टीकाही त्‍यांनी यावेळी केली होती.

आसामचे मुख्‍यमंत्री सरमांनी दिले प्रत्‍युत्तर

सॅम पित्रोदा यांच्या मुलाखतीची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, 'सॅम भाई, मी ईशान्येचा आहे आणि भारतीय दिसतो. आम्ही विविधतेवर विश्वास ठेवतो. आपण भिन्न दिसू शकतो, परंतु आपण सर्व एक आहोत. आपल्या देशाबद्दल थोडे समजून घ्या.

त्‍यांची विचारधारा फूट पाडा आणि राज्‍य करा : कंगना रणौत

अभिनेत्री-राजकारणी बनलेली कंगना रणौतने काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे गुरु पित्रोदा संपूर्ण विचारधारा ही फूट पाडा आणि राज्य करा, अशी आहे. त्‍यांनी भारतीयांना चिनी आणि आफ्रिकन म्हणणे हे दु:खदायक आहे. काँग्रेसला लाज वाटते!" अशी टीका तिने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये केली आहे.

शिवसेना ठाकरे गटांनेही केली पित्रोदांवर टीका

काँग्रेसच्या मित्रपक्ष शिवसेना ठाकरे गटाच्‍या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही सॅम पित्रोदा यांच्‍यावर निशाणा साधला आहे. "मी त्यांच्या विधानाशी सहमत नाही. पण, ते जाहीरनामा समितीचे सदस्य आहेत, काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत आणि ते या देशात राहतात का? ते परदेशात राहतात. हे दुर्दैवी आहे." असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news