नाशिक : आषाढीसाठी लालपरी सज्ज ; जिल्ह्यातून धावणार 250 जादा बसेस | पुढारी

नाशिक : आषाढीसाठी लालपरी सज्ज ; जिल्ह्यातून धावणार 250 जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंढरपूरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात 4 हजार 700, तर एकट्या नाशिक जिल्ह्यातून अडीचशे जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे जाणार्‍या भाविकांची गैरसोय टळणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणार्‍या भाविकांची संख्या जास्त असते. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन 6 ते 14 जुलैदरम्यान नाशिक विभागातून 260 जादा बसेस धावणार आहेत. त्यासाठी सुमारे सहाशे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी व अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. आषाढीच्या काळात प्रत्येक आगाराच्या बसस्थानकावर उपाहारगृहे, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका, आरोग्य केंद्र, शुद्ध पिण्याचे पाणी आदी मूलभूत सुविधा एसटी प्रशासनाकडून पुरविण्यात येणार आहे. नाशिक-पंढरपूर मार्गावर एसटीची दुरुस्ती पथके तैनात असणार आहेत. तर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रत्येक आगारात यात्रा केंद्र अर्थात बसस्थानके निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे भाविकांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटीचाच वापर करावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले.

आगारनिहाय यात्रा केंद्रे
नाशिक (1 व 2) – महामार्ग बसस्थानक
मालेगाव – नवीन बसस्थानक, रावळगाव,
सटाणा – नामपूर, देवळा, ताहाराबाद, सटाणा
मनमाड – मनमाड, चांदवड
सिन्नर – सिन्नर, वावी
लासलगाव – लासलगाव, विंचूर, निफाड, चांदोरी
नांदगाव – नांदगाव
इगतपुरी – इगतपुरी, घोटी
येवला – येवला
कळवण – कळवण, वणी
पेठ – पेठ
पिंपळगाव (ब) – पिंपळगाव, ओझर

हेही वाचा :

Back to top button