‘वन-वे’ म्हणजे काय रे भाऊ..? | पुढारी

‘वन-वे’ म्हणजे काय रे भाऊ..?

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वाहनचालकांना शिस्त लागावी… वाहतूक कोंडी टाळता यावी… स्थानिक रहिवाशांना त्रास होऊ नये… अशा विविध उद्देशांनी वाहतुकीचे नियम बनवले जातात. पण वाहनधारक याकडे पूर्णत: दुर्लक्ष करताना दिसून येतात. दंडात्मक कारवाईची रक्कम चौपट ते पाचपट झाली असली तरी वाहतून नियम मोडणार्‍यांची संख्या मात्र काही कमी होताना दिसत नाही. एकेरी मार्गांचे (वन-वे) उल्लंघन करणार्‍यांना रोखणार कोण? हा प्रश्न आहे.

वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी पोलिस प्रयत्नशील असतात. एकेरी मार्गावरून उलट्या दिशेने जाणे, वेग मर्यादेचे उल्लंघन, फॅन्सी नंबरप्लेट, सायलेंट झोनमध्ये कर्णकर्कश हॉर्न वाजविणे असे प्रकार नियमित घडताना नजरेस पडतात. नियम मोडणार्‍यास पोलिस पकडण्याचा प्रयत्न करताना अनेकजण पळून जातात; पण अशावेळी अपघाताचाही धोका संभवतो. शहरातील बहुतांश एकेरी मार्गांवर वाहनचालकांकडून नियमांचे उल्लंघन होते. अशा एकेरी मार्गांवर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून कारवाईची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होते आहे.

Back to top button