नाशिक : बसप्रवासात डायमंड जडीत सोन्याचे दागिने लंपास | पुढारी

नाशिक : बसप्रवासात डायमंड जडीत सोन्याचे दागिने लंपास

नाशिक : शालिमार ते महामार्ग बसस्थानकादरम्यान प्रवासात चोरट्याने महिलेच्या पर्समधील दागिने चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि. २७) दुपारी घडली. याप्रकरणी मनीषा सोनवणे (रा. स्नेहबंधन पार्क, शरणपूर रोड) यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली आहे.

मनिषा यांच्या फिर्यादीनुसार त्या बसमधून प्रवास करत असताना चोरट्याने मनीषा यांच्या पर्समधील ३८ हजार ५८१ रुपयांचे डायमंड जडीत सोन्याचे दागिने व एक हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button