नाशिक : एटीएम कार्डची अदलाबदली करून महिलेला घातला गंडा | पुढारी

नाशिक : एटीएम कार्डची अदलाबदली करून महिलेला घातला गंडा

नाशिक : पिनकोड जनरेट करून देण्याच्या बहाण्याने एकाने महिलेकडील एटीएम कार्डची अदलाबदली करून गंडा घातला. अर्चना श्रीराम रोकडे (रा. नागजी चौक) यांच्या फिर्यादीनुसार, त्या शुक्रवारी (दि. 3) दुपारी अडीचच्या सुमारास द्वारका येथील एटीएम केंद्रात पिनकोड जनरेट करण्यासाठी गेल्या होत्या.

त्यावेळी 30 ते 40 वयोगटातील संशयिताने त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड घेतले आणि अर्चना यांना दुसरेच एटीएम कार्ड देत त्यांचे एटीएम वापरून 23 हजार 100 रुपये काढून घेत अर्चना यांची फसवणूक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

Back to top button