‘प्रदूषण नियंत्रण’ची महापालिकेला नोटीस; 70 नाल्यांच्या पाण्यावर काय प्रक्रिया केली ते सांगा | पुढारी

‘प्रदूषण नियंत्रण’ची महापालिकेला नोटीस; 70 नाल्यांच्या पाण्यावर काय प्रक्रिया केली ते सांगा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरातील मुळा-मुठा नद्यांच्या पात्रात शहराच्या 70 नाल्यांतून पाणी जाते. याची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतीच एक नोटीस महापालिकेला पाठवली आहे. शहराच्या 70 नाल्यांच्या पाण्यावर काय प्रक्रिया केली ते सांगा. तसेच 10 लाख रुपयांची बँक गॅरंटी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला मागितली आहे.

शहराची लोकसंख्या जशी झपाट्याने वाढत आहे तसा सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर होत आहे. शहरातील अनेक ओढ्यांचे नाल्यात रूपांतर झाले. आजघडीला 70 नाल्यांतून हे पाणी वाहत जाऊन शहरातून वाहणार्‍या मुळा व मुठा या नद्यांत जाऊन मिळाल्याने या नद्या भयंकर प्रदूषित झाल्या. त्यामुळे केंद्र शासनाने जायका प्रकल्पाची घोषणा केली. मात्र, तो लांबतच चालल्याने सांडपाणी व्यवस्थापन व त्याचे शुद्धीकरण, नाल्याच्या पाण्याचे शुद्धीकरण, याची जबाबदारी महापालिकेची आहे.

अतिक्रमणाने त्रासलेले व्यापारी थेट आमदार तनपुरेंच्या घरी

10 लाखांची मागितली बँक गॅरंटी

प्रदूषण नियंत्रण मंडळाने 29 एप्रिल 2022 रोजी ही नोटीस महापालिकेला पाठवली आहे. यात म्हटले आहे की, प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाणी प्रकिया प्रकल्प चालविण्याची परवानगी महापालिकेला दिली आहे. त्यापोटी 10 लाखांची बँक गॅरंटी महापालिकेने मंडळाकडे द्यावी तसेच पाणी नदीपात्रात सोडताना त्यावर प्रक्रिया करूनच सोडलेले हवे. याबाबत महापालिकेने आपला अहवाल पाठविलेला नाही. याबाबत 28 एप्रिल 2022 रोजी सुनावणीची तारीखही महापालिकेला देण्यात आली होती.

पाण्याच्या गुणवत्तेची माहिती मागवली

प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाठविलेल्या नोटिशीत म्हटले आहे की, पालिकेने शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा योजनेचा ताळेबंद तसेच शहरातून वाहणार्‍या 70 नाल्यांच्या पाण्याची गुणवत्ता कळवावी. तसेच, 9 सप्टेंबर 2020 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत ही जबाबदारी महापालिकेवर राहील, असे स्मरणही या नोटीसमध्ये करून देण्यात आले आहे.

हेही वाचा 

अतिक्रमणाने त्रासलेले व्यापारी थेट आमदार तनपुरेंच्या घरी

राज्यसभा निवडणूक : आमच्या सोबत कोण, हे दहा तारखेला कळेल : सतेज पाटील

दै. ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन : जिल्हास्तरीय शालेय प्रश्नमंजुषा स्पर्धेस २० जूनपर्यंत मुदतवाढ

Back to top button