नाशिक : मनेगावसह 22 गावे पाणीयोजनेचा पंप केला स्वखर्चाने दुरुस्त | पुढारी

नाशिक : मनेगावसह 22 गावे पाणीयोजनेचा पंप केला स्वखर्चाने दुरुस्त

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
विद्युत पंप बिघाड झाल्यानंतर प्रशासनाकडून दुरुस्तीची वाट न बघता राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी स्वखर्चाने मनेगावसह 22 गाव पाणीपुरवठा योजनेवरील विद्युतपंप खोलून नेत त्याची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत केला.

तालुक्यातील पाणीटंचाईचे संकट गेल्या काही दिवसांपासून गडद होत आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळही येत आहे. मनेगाव पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पिण्याची पाण्याची व्यवस्था होत आहे. यासाठी मुरकुटे यांनी काही दिवसांपूर्वी योजनेचे थकलेले वीजबिलही स्वखर्चाने भरत ही योजना पूर्ववत केली होती. यानंतर नुकतेच या योजनेवरील विद्युत पंपात बिघाड झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे 22 गावांचा पुरवठा ठप्प झाल्याने महिलांना भटकंती करण्याची वेळ आहे. मुरकुटे यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तत्काळ स्वतः योजनेवर जाऊन बिघाड झालेला विद्युत पंप काढून आपल्या वाहनाने नेऊन त्याची दुरुस्ती करून आणत पुन्हा योजनेवर जाऊन सदर पंप जोडून पाणीपुरवठा सुरळीत केला. यामुळे महिलांची पाण्यासाठी होणार असलेली भटकंती थांबल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. त्यांना धोंडवीरनगर सरपंच शिवाजी सोनवणे, तुकाराम उगले, केरु उगले, रामभाऊ काळोखे, अरुण सोनवणे, चंदू वाकचौरे यांनी मदत केली.

हेही वाचा:

Back to top button