नाशिक : मान्सूनपूर्व तयारीकरीता जिल्ह्यातील होमगार्डसाठी प्रशिक्षण शिबिर | पुढारी

नाशिक : मान्सूनपूर्व तयारीकरीता जिल्ह्यातील होमगार्डसाठी प्रशिक्षण शिबिर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मान्सून पूर्व तयारीकरीता उपमहासमादेशक होमगार्ड व उपसंचालक नागरी संरक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा समादेशक यांनी होमगार्ड यांचे पाच दिवसीय आपत्ती जोखीम प्रवण प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

शिबिराकरीता जिल्हयातील २०० होमगार्ड यांना प्रशिक्षण देण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. आपत्ती जोखीम प्रवण प्रशिक्षण शिबिराचा शुक्रवारी (दि.३) समारोप होणार असून यामध्ये  मान्सून पूर्व पूर विमोचन, बोट प्रशिक्षण, आपत्तीच्या वेळी कसे सामोरे जावे याबाबत होमगार्ड यांना प्रशिक्षण देण्यात आले. डोंगराळ भागात दरड कोसळणे याबाबत प्रशिक्षण देणे कामी एसडीआरएफ धुळे यांच्या पथकामार्फत प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. केटीएचएम महाविद्यालय बोट क्लब येथे बोट प्रशिक्षणकामी जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलिस अधिक्षक तसेच नाशिक ग्रामिणच्या माधुरी कांगणे यांनी प्रशिक्षणपूर्वी बोटचे पूजन केले. याप्रसंगी केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, एसडीआरएफ धुळे पथकाचे पारसकर पथक प्रमुख, सहाय्यक गावडे, तायडे तसेच होमगार्ड कार्यालय येथील प्रशासिक अधिकारी काळे, केंद्रनायक बागूल, मानसेवी प्रशासिक अधिकारी, नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षक बावसकर, गढरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button