Jalgaon News | आयकर विभागाने सोडले बाफना ज्वेलर्सचे सोने | पुढारी

Jalgaon News | आयकर विभागाने सोडले बाफना ज्वेलर्सचे सोने

जळगाव : पुढारी वृत्तसेवा-  लोकसभेच्या निवडणुकीच्या उद्देशाने जागोजागी चेक नाके बसवण्यात आले आहेत. अशात कुसुंबा नाका येथे दि.20 रोजी सायंकाळी बाफना ज्वेलर्सच्या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये २७ किलो हे वजन दागिने पॅक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या डब्यांसहित एकत्रित पार्सलचे वजन होते. याची माहिती जळगाव नाशिक आयकर विभागाला देण्यात आली होती.

दि. २० रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास लोकसभा निवडणुक सुरू झालेल्या असल्याने कुसुंबा नाका येथील चेक पॉईन्ट बाफना ज्वेलरी शोरूमच्या मालाची वाहतूक करणारे सिक्वेल लॉजेस्टिक या कंपनीचे MH१२ VT ८६२९ हे बोलेरो वाहन SDM महेश सुधळकर, उपविभागीय अधिकारी तथा सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पथकाद्वारे थांबविण्यात आले. वाहनात सोने, चांदी व हिन्ऱ्यांचे ऐवज असल्याचे वाहनासोबत असलेल्या डिलिव्हरी असिस्टंट बाबासाहेब बबन राठोड या व्यक्तीने पथकाने विचारलेल्या प्रश्नावर सांगितले. वाहन एन. आय.डी.सी. पोलीस स्टेशन जमा केले. पथकाने वाहनसोबत असलेले कोणतेही कागदपत्र चेक न करता, अधिकची चौकशी न करता सदर वाहन एन. आय.डी.सी. पोलीस स्टेशनला जमा केले. तशी स्टेशन डायरीमध्ये सायंकाळी ७.५३ मिनिटांनी क्र.४०/२०२४ नोंद करून पुढील चौकशीकामी मा.सह. आयुक्त आयकर विभाग, सर्कल-१ जळगांव यांना सूचित केले.

तशी स्टेशन डायरीमध्ये सायंकाळी ७.५३ मिनिटांनी क्र.४०/२०२४ नोंद करून पुढील चौकशीकामी मा.सह. आयुक्त आयकर विभाग, सर्कल-१ जळगांव यांना सूचित केले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री आयकर विभागाचे पथक शोरूम आले, त्यांनी रात्री चौकशी केली, दुसऱ्या दिवशी नाशिक येथून आयकर विभागाचे पुन्हा एक पथक आल्यावर त्यांनीही सखोल चौकशी केली, त्यात आमची दागिने ऑर्डर करण्याची पद्धत, दागिन्यांची बीत, दागिन्यांचे बील कसे अदा केले त्याबाबतचा तपशील व बिलाप्रमाणे दागिन्यांच्या नोंदी वाहनात असलेल्या तपशीलासोबत मॅच होत आहेत की, हे सगळे क्रॉस चेक केले. त्यानंतर संबंधित अधिकारी वर्गाची खात्री झाली.

वाहनातील वस्तू मौल्यवान असल्याने योग्य ती दक्षता घेऊन सिक्वेल लॉजिस्टिक यांना वाहन सोडण्याबाबत कळविले. त्यानुसार शुक्रवार २६ रोजी दुपारी एम.आय.डी.सी. पोलिसांनी बाफना शोरूमच्या प्रतिनिधी समक्ष सदर वाहन सिक्वेल लॉजिस्टिकच्या प्रतिनिधींकडे सोपवून संबंधित वाहन पोलीस वाहनासोबत सुरक्षितरित्या शोरूमला पोहचेपर्यंत एक पोलीस अधिकारी व दोन पोलीस कर्मचारीयांच्यासह सुरक्षा दिली.

२७ किलो हे वजन दागिने पॅक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या डब्यांसहित एकत्रित पार्सलचे वजन होते. प्रत्यक्षात सोने ९०५२.९६० kg, चांदी ११८९१.६२० kg व डायमंड अलंकार ११०.८७० असे सर्व मौल्यवान वस्तूचे एकूण वजन २१०५५.४५० kg असे होते.

“जहाँ विश्वास ही परंपरा है” या ब्रीदवाक्याच्या अनुषंगानेच आदरणीय बाफनाजींनी घालून दिलेल्या आदर्शावर गेल्या ५० वर्षांपासून रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सची वाटचाल सुरू आहे, पण काही वेळा गैरसमजुतीतून लोक शंका घेऊ शकतात, त्यासाठीच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यातून जनतेसमोर सत्य नक्की पोहचेल असा आमचा विश्वास आहे. अशी माहिती सुशील कुमार बाफना, सिद्धार्थ रतनलाल बाफना यांनी दिली.

हेही वाचा –

Back to top button