नाशिक : विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी योगदानाची गरज : दळवी | पुढारी

नाशिक : विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीसाठी योगदानाची गरज : दळवी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) कार्यक्रम अधिकार्‍यांनी सक्रिय योगदान दिले पाहिजे. एनएसएसचे काम स्वयंप्रेरणेने करून त्यासाठी तन-मन-धन अर्पण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डी. ए. दळवी यांनी केले.

एनएसएस राबविणार्‍या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) कार्यक्रम अधिकार्‍यांच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विशेष कार्य अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे, सहसंचालक प्रफुल वाकडे, योगेश पाटील, ज्योती लोहार, सहायक संचालक एम. के. पाटील, निरीक्षक अपर्णा कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी कौशल्य, रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. लोहार यांनी सूत्रसंचालन केले, तर पाटील यांनी आभार मानले.

हेही वाचा:

Back to top button