नाशिक : भरधाव दुचाकीच्या धडकेत एक ठार | पुढारी

नाशिक : भरधाव दुचाकीच्या धडकेत एक ठार

नाशिक : भरधाव दुचाकीची धडक बसल्याने दुसर्‍या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गणेशवाडीतील आयुर्वेदिक रुग्णालयाजवळ घडली.

यात विजयप्रसाद राजकिशोर शर्मा (47, रा. हिरावाडी) यांचा मृत्यू झाला. शर्मा हे शुक्रवारी (दि.27) रात्री दुचाकीवरून घराकडे जात होते. त्यावेळी अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. संशयित दुचाकीचालक फरार झाला. या प्रकरणी त्याच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button