अकोला : मित्रांना मारल्याच्या रागातून युवकाचा खून

अकोला : मित्रांना मारल्याच्या रागातून युवकाचा खून
Published on
Updated on

अकोला; पुढारी वृत्तसेवा : मित्रांना मारहाण केल्याच्या रागातून अकोला शहरातील मोठी उमरी रेल्वे पुलाजवळ एका युवकाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. उमेश अंबादास अटाळकर (वय ३८) रा. लहान उमरी, अकोला असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना रविवारी (२९ मे) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी नंदू राजेश बागडे (वय १९) याला सिव्हील लाईन्स पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमेश अटाळकर हा संशयीत आरोपी नंदू व त्याच्या मित्रांना मारहाण करत होता. या रागातून नंदूसह त्याच्या तीन मित्रांनी रविवारी रेल्वे पुलाजवळ उमेशवर प्राणघातक हल्ला केला. उमेशच्या छातीवर आणि चेहऱ्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. स्थानिक नागरिकांनी उमेशला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिसांत झाली आहे. या प्रकरणी नंदू याला अटक करण्यात आले असून अन्य दोघे फरार आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार भानुप्रताप मडावी, एपीआय शांताराम सावळे, आशीष ठाकूर, रवी यादव, उमेश पाटील, रवी काटकर करत आहेत.

हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news