चाकण येथे टोमॅटोचे दर निम्म्यावर; सर्व सामान्यांना मोठा दिलासा

चाकण येथे टोमॅटोचे दर निम्म्यावर; सर्व सामान्यांना मोठा दिलासा

चाकण : पुढारी वृत्तसेवा

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण मार्केटमध्ये शनिवारी (दि. 28) टोमॅटोची आवक वाढल्याने भावात घसरण झाली. 215 क्रेट आवक होऊन प्रतिकिलोला 35 ते 40 रुपये भाव मिळाला आहे.

घाऊक बाजारात मागील आठवड्यामध्ये टोमॅटोचे दर प्रतिकिलो 60 ते 80 रुपये आणि किरकोळ बाजारात 100 रुपये झाले होते. यात निम्म्याने घसरण झाल्याचे अडत्यांनी सांगितले. कांद्याचे भाव कोसळले असले तरी टोमॅटोच्या भावात मागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत होती.

वाढती उष्णता, बाजारात यापूर्वी नसलेली मागणी आणि लागवडीत घट या तीन बाबींचा परिणाम टोमॅटो मार्केटवर झाल्याचे अडते सांगत आहेत. दरम्यान, आवक वाढून टोमॅटोचे दर स्थिर झाले आहेत. पुढील काळात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन दर स्थिर राहणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news