जळगाव : मुंबई-रिवा आणि पुणे-जबलपूर साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ | पुढारी

जळगाव : मुंबई-रिवा आणि पुणे-जबलपूर साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, रेल्वे मुंबई – रिवा आणि पुणे – जबलपूर दरम्यान उन्हाळी विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ०२१८८ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – रिवा विशेष गाडी दर शुक्रवारी दि. १ जुलैपर्यंत धावण्यासाठी अधिसूचित होती. या गाडीला आता दि. २९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, तर ०२१८७ – रिवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही विशेष गाडी दर गुरुवारी दि. ३० जूनपर्यंत अधिसूचित होती. ही गाडी आता दि. २८ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ०२१३१ पुणे – जबलपूर अतिजलद विशेष गाडी दर सोमवारी दि. २७ जूनपर्यंत अधिसूचित होती. या गाडीला आता १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ०२१३२ – जबलपूर – पुणे अतिजलद विशेष गाडीला दर रविवारी दि. १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button