जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत १ कोटी १५ लाखांची फसवणूक; बारामतीच्या लाकडी येथील घटना | पुढारी

जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत १ कोटी १५ लाखांची फसवणूक; बारामतीच्या लाकडी येथील घटना

बारामती : पुढारी वृत्तसेवा

जमिनीचा मूळ मालक असल्याचे भासवत दाेघांनी लाकडी (ता. इंदापूर) येथील ३ हेक्टर ४८ आर शेतजमीन नावावर करून देत १ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक केली. जमिनीच्या मूळ मालकाची भेट झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नाेंदवण्यात आला आहे.

याबाबत किशोर हनुमंत खाडे (रा. रुई, ता. बारामती) यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून स्वतःचे नाव नरेश दुसेजा आणि प्रशांत जगताप (रा. पुणे) असे नाव सांगणाऱ्या दोघांविरुद्ध वरील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी नरेश दुसेजा नावाच्या व्यक्तीने लाकडीतील जमीन त्याचीच असल्याचे भासवत खरेदीखत करून दिले आहे. याकामी प्रशांत जगताप याने त्यांना सहाय्य केले.

दुहेरी खुनामुळे धुळे जिल्हा हादरला, माय-लेकीची धारदार शस्त्राने हत्या

फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला शेतजमीन घ्यायची होती. जमीन एजंट शहाजी नरुटे (रा. काझड, ता. इंदापूर) यांची फिर्यादीशी भेट झाली. नरुटे यांनी लाकडी येथील जमिन गट क्रमांक ९३ मधील ३ हेक्टर ४८ आर जमीन विकायची असल्याचे सांगितले. दुसेजा (बनावट व्यक्ती) यांच्याशी बोलणे करून दिले. फिर्यादीने जमीन पाहून व्यवहार ठरवला. त्यावेळी नरेश गोपीचंद दुसेजा व प्रशांत जगताप नाव धारण केलेले दाेघे गाडीमधून तेथे आले होते. दुसेजा याने ही जमीन स्वतःची असल्याचे सांगितले. १ कोटी १५ लाखांना हा व्यवहार ठरला. इसारापोटी रक्कमही देण्यात आली.

या वेळी दुसेजा नावाच्या व्यक्तीने माझा मुळ दस्त हरवला आहे, तो दुय्यम निबंधक कार्यालयातून काढून घेतो असे सांगत इसार पावती केली. त्यापोटी दिलेला १२ लाखांचा चेक नरेश दुसेजा नावाच्या व्यक्तिच्या नावे बारामतीच्या ॲक्सिस बॅंकेतून वटला. ३० एप्रिल रोजी फिर्यादीला समजले की दुसेजा नावाच्या व्यक्तीने या जमिनीचा व्यवहार यापूर्वीच संजय वामन ढोले (रा. लाकडी) यांना करून दिलेला आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ त्या व्यक्तीला संपर्क साधला. त्यांनी ढोले यांची भेट घेतली. तुमच्या दोघांपैकी जो कोणी अगोदर खरेदीखत करून घेईल त्याला मी जमीन देणार असल्याचे सांगितले. फिर्यादी व ढोले हे नातेवाईक असल्याने त्यांनी ढोले यांची इसारपावती रद्द करण्याचा व त्यांची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला.

Karan Mehra Allegations : अभिनेता करण मेहराचे पत्‍नी निशा रावलवर गंभीर आरोप

या जमिनीचे शासकीय मूल्य २४ लाख आहे. तेवढ्या रकमेचा दस्त करण्याचे फिर्यादीचे नियोजन होते. परंतु दुसेजा व जगताप नामक व्यक्तींनी आम्हाला टॅक्सची अडचण येईल, शासकीय किमतीचाच दस्त करा व उरलेली रक्कम रोख द्या असे सांगितले. त्यानुसार फिर्यादीने स्वतःच्या, भावाच्या व मामांच्या नावाचे चेक त्यांना दिले. त्यानंतर बारामतीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात १० मे रोजी दस्त करण्यात आला. उरलेली ८८ लाख ६५ हजारांची रक्कम त्यांना रोखीत देण्यात आली. बारामतीतील ॲड. भापकर यांनी दि. २० मे रोजी फिर्यादीला फोन करत तुम्हाला बनावट व्यक्तीने दस्त करून दिले आहे, असे सांगितले.

Bihar Politics : बिहारमध्ये राजकीय खळबळ, नितीश कुमारांचे फर्मान- आमदारांनी पुढील ७२ तास पाटणाबाहेर जाऊ नये

मूळ मालक नरेश दुसेजा यांची त्यांनी भेट घालून दिली. यावेळी मूळ मालक दुसेजा यांनी फिर्यादीला शेलार यांच्याकडून जमीन घेतल्याची कागदपत्रे तसेच स्वतःचे आधार, पॅनकार्ड दाखवले. फिर्यादीने दस्तावेळी दुसेजा नावाच्या व्यक्तीने दिलेले पॅन, आधार कार्ड पाहिले असता ते बनावट असल्याचे लक्षात आले. बनावट व्यक्तींनीच जमीन त्यांची नसतानाही बनावट कागदपत्रे तयार करत आपली फसवणूक केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Back to top button