नाशिककरांना मनपाचे पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन | पुढारी

नाशिककरांना मनपाचे पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या उन्हाळा सुरू असून, पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह उपनगरांमध्ये पाणी बचतीबाबत नियोजन केले जात आहे. संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी नाशिककरांनी पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग अर्थात पाणीपुरवठा वितरण विभागाकडून करण्यात आले आहे.

पाणी शिळे होत नसल्याने उरलेले पाणी फेकून देऊ नये, पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे, अंघोळीसाठी शॉवरचा वापर टाळावा, घरांच्या पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी आणि बॉलव्हॉल्व्ह व सेंसरचा वापर करावा, नळीचा वापर करून वाहने धुऊ नये, अंगणात अथवा रस्त्यावर सडा मारून पाण्याचा अपव्यय करू नये, नळ कनेक्शनला डायरेक्ट मोटर/पंप बसवू नये, पाणी साठविण्यासाठी जमिनीत टाकी नसल्यास ते बांधावे, असे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नागरिकांना पाइपलाइन लीकेज, पाण्याचा अपव्यय निदर्शनास आल्यास नागरिकांनी तसा फोटो व त्याचा सविस्तर पत्ता व इतर (शक्यतो जिओ टॅगिंग अपलोड) तपशील संबंधित विभागातील अधिकार्‍यांना त्वरित पाठवावे. जलवाहिनीची गळती रोखण्यासाठी सहा विभागांत अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

Back to top button