नाशिक : अंगणवाड्यांच्या वेळेत उन्हामुळे बदल | पुढारी

नाशिक : अंगणवाड्यांच्या वेळेत उन्हामुळे बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : उन्हाचा कडाका वाढला असल्याने एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाड्यांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दि. 6 मे ते 15 जून या काळात राज्यातील सर्व अंगणवाड्यांची वेळ बदलण्यात आली आहे. अंगणवाड्यांचे कामकाज सकाळी साडेसात ते दुपार साडेबारापर्यंत राहील, तर बालकांना पोषण आहार देण्याची वेळ सकाळी आठ ते सकाळी साडेदहा अशी करण्यात आली आहे. एकात्मिक बालविकास विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी हे आदेश दिले आहेत.

राज्यात उष्णतेची लाट तीव्र असून, सगळीकडे दुपारचे कमाल तापमान 40 अंशांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे अनेकांना उष्माघात झाल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीत अंगणवाड्यांमध्ये येणार्‍या बालकांना त्रास होऊ नये म्हणून एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदललेल्या वेळेनुसार, बालकांना शिक्षण व पोषण आहार देण्याची वेळ सकाळी आठ ते साडेदहा करण्यात आली आहे. तसेच अंगणवाडी कर्मचार्‍यांनी त्यांची योजनांची कामे सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा या वेळेत करावीत, असेही याबाबतच्या आदेशात म्हटले आहे. राज्यभरातील सर्व अंगणवाड्या 16 जूनपासून नियमित वेळेनुसार भरतील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button