नाशिक : आदिवासींच्या विकासाला प्राधान्य; आदिवासी उद्योजकांची कार्यशाळा | पुढारी

नाशिक : आदिवासींच्या विकासाला प्राधान्य; आदिवासी उद्योजकांची कार्यशाळा

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकार आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. तनिष्का लॉन्स येथे दिंडोरी, सुरगाणा, कळवण, पेठ, इगतपुरी तालुक्यांतील आदिवासी उद्योजक व व्यावसायिकांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत हात्या.

याप्रसंगी आदिवासी प्रकल्प आयुक्त विकास मीना, उपविभागीय अधिकारी आहेर, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, जिल्हा उद्योग केंद्राचे अमोल रोकडे, सहायक आयुक्त ए. एल. तडवी, श्रावण देवरे, अमोल लोहकरे आदींसह डॉ. मधुकर आचार्य, महेंद्र पारख, आनंदराव चौधरी, मधुकर भरसट, उत्तम जाधव, किरण गांगुर्डे, सदाशिव गावित, मयूर जैन, संतोष गवळी आदी उपस्थित होते. डॉ. पवार यांनी जिल्ह्यासाठी 4 एकलव्य निवासी शाळा दिल्या असून, केंद्रीय आरोग्य विभागाकडून दि. 18 ते 22 एप्रिलदरम्यान प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर घेण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी मधमाशी पालन व कौशल्य विकास अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व मधमाशी पालन पेटीचे वाटप करण्यात आले. एन. डी. गावित यांनी प्रास्ताविक केले. रविकुमार सोनवणे यांनी आभार मानले.

हेही वाचा:

Back to top button