Richa Chadha weight loss : ऋचा चड्ढाने १५ किलो वजन कसं कमी केलं? | पुढारी

Richa Chadha weight loss : ऋचा चड्ढाने १५ किलो वजन कसं कमी केलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक सेलेब्स  वजन कमी करण्‍यावर भर दिला आहे. त्यांचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून त्यांच्या चाहत्यांनाही असे वाटते की, आपलंही रुप बदलावं. रॅपर आणि गायक बादशाहने तसेच कॉमेडियन भारती सिंगनेही वजन कमी करून आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आता या यादीत अभिनेत्री ऋचा चड्ढा (Richa Chadha weight loss) हिच्या नावाचा समावेश झाला आहे. तिने तिच्या सोशल अकाऊंटवर नवीन लूकचे फोटो शेअर केले आहेत. चला जाणून घेऊया, तिच्या या फोटोंमध्ये काय खास आहे? (Richa Chadha weight loss)

ऋचाचे वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशन

वास्तविक, नुकतेच ऋचाने तिच्या सोशल अकाऊंटवरून काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ऋचा खूप सुंदर, बोल्ड आणि फिट दिसत आहे. ऋचाने फिटनेसबाबत तिच्या चाहत्यांना कधीच निराश केले नाही; परंतु तिचा नवा लूकवर चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. फोटोंमध्ये ऋचा तिच्या नवीन लूकमध्ये आत्मविश्वासाने भरपूर दिसत आहे.

richa chadha

ऋचा वजन कमी केल्यानंतर म्हणाली, “एकूणच मला स्वस्थ राहायचं होतं….चांगली झोप घ्यायची होती आणि स्पीड, एक्सरसाईजमध्येदेखील सुधारणा करायची होती. खूप व्यायाम केल्यानंतर शरीरावर वाईट परिणाम दिसू लागतं. अति व्‍यायामामुळे तुमच्या अवयवांना नुकसान पोहोचू शकते. एक अभिनेत्री म्हणून आराम खूप गरजेचं आहे. पण, यावर लक्ष दिलं जात नाही.”

ऋचाने मेसेज केला शेअर

ऋचाने तिच्या चाहत्यांसाठी एक सुंदर मेसेज शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, ‘मला फोटोशूट करायला आवडते, विशेषत: ज्या शूटमध्ये मी आणि फोटोग्राफर मित्र असतो. हे फोटोशूट करताना मला असे वाटते की मी एक पात्र साकारत आहे. ही भावना चित्रीकरणापेक्षा पूर्णपणे वेगळी आणि मनोरंजक आहे”. रिचाच्या या नव्या ट्रान्सफॉर्मेशनचे सर्वजण कौतुक करत आहेत.

richa chadha

ऋचाने सांगितले हेल्दी वेट लॉस म्हणजे काय?

ऋचाने तिच्या फोटोंसोबत हेल्दी वेट लॉसबद्दलही सांगितले आहे. ऋचाने फोटोशूटमधील जे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात निरोगी वजन कमी करण्याचा प्रचार केला आहे. तज्ज्ञ असेही मानतात की, निरोगी वजन कमी करणे हेच आहे. ज्यामध्ये तुम्ही संतुलित आहार घ्या आणि स्नायू कमी करण्याऐवजी चरबी कमी करा.

वेट मॅनजमेंटवर काय म्हणाली ऋचा?

ऋचाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, प्रत्येकजण मला वेगवेगळे सल्ले देतात, काही म्हणतात की, तुझे वजन कमी झाले आहे, कोणी म्हणतात की, तुझे वजन वाढले आहे;  परंतु मी त्याकडे फारसे लक्ष देत नाही कारण तुझ्या शरीरात दररोज बदल होत आहेत. आणि त्यात नवीन बदल होत आहेत. ज्यांवर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे; पण निरोगी राहणे आपल्या हातात आहे. ऋचाचे हे फोटो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. चाहत्यांनीही तिच्या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. ऋचाचे फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत.

१५ किलो वजन कमी केले

ऋचाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिने ३ महिन्यांत १५ किलो वजन कमी केले. ती लवकरच अभिनेता अली फजलसोबत लग्नगाठ बांधणार आहे. कोविडमुळे ऋचा आणि अलीच्या लग्नाला उशीर झाला. या वर्षी तिचे लग्न होणार आहे. ऋचाचा हा नवा लूक पाहून चाहत्यांसोबतच सर्व कलाकार आणि सोशल मीडियावर आश्चर्य आणि आनंद व्यक्त करत आहेत.ऋचा शेवटची लाहोर कॉन्फिडेंशियल या चित्रपटात दिसली होती. आता ती पुन्हा एकदा फुक्रे-३ मध्ये भोली पंजाबनच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Richa Chadha (@therichachadha)

Back to top button