राजगुरूनगर येथे गावठी पिस्तुल बाळगणाऱ्यास अटक | पुढारी

राजगुरूनगर येथे गावठी पिस्तुल बाळगणाऱ्यास अटक

राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा : राजगुरूनगर शहरातील कुंभारवाडा येथे राहणाऱ्या युवकाकडे गावठी पिस्तूल मिळुन आले. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या तरुणाला अटक केली आहे. रोहन शिंगोले असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. १८) रात्री गस्त सुरू असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. जिल्ह्यामध्ये बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणारे अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्याप्रमाणे ही कारवाई करण्यात आली.

आरोपी रोहन शिंगोले हा त्याच्या ताब्यात असलेले एक गावठी पिस्तुल कमरेला लावून या भागात फिरत होता. मंचरकडे जाणाऱ्या रस्त्यावर चासकमान कालव्याच्या बाजुला उभा असताना त्याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. चौकशी अंती त्याचे नाव रोहन हिराजी शिंगोले (वय-२०, रा. कुभांरवाडा राजगुरूनगर, ता. खेड) असे निष्पन्न झाले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा मिळून आला. त्याच्या ताब्यातून पिस्तुल आणि एक मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील तापासकामी खेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस शिवाजी ननवरे, दिपक साबळे, विक्रम तापकीर, अमोल शेडगे, संदिप वारे, अक्षय नवले, धीरज जाधव, निलेश सुपेकर, पूनम गुंड, दगडू वीरकर यांनी ही कारवाई केली.

हे वाचलंत का? 

Back to top button