…पायाच्या अंगठ्याचा ठसा घेऊन नोंदवले आधारकार्ड | पुढारी

...पायाच्या अंगठ्याचा ठसा घेऊन नोंदवले आधारकार्ड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिव्यांग व्यक्तींसाठी शासनाने अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी काही यंत्रणांकडून मात्र त्याकडे डोळेझाक होत असते. काही शासकीय यंत्रणा मात्र सजगता दाखवून दिव्यांगांच्या मदतीला धावून जात असतात. त्याचा प्रत्यय नाशिकच्या पोस्ट कार्यालयाकडून आला.

त्र्यंबक तालुक्यातील हरसूल येथील दिव्यांग व्यक्ती अंबादास एन आसरे हे गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील आधारकार्ड नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करत होती. परंतु, संबंधित व्यक्तीला दोन्ही हात नसल्याने संबंधित आधारकार्ड नोंदणी केंद्रचालकांकडून आधारकार्ड नोंदणीसाठी चालढकल केली जात होती. याबाबत माहिती मिळताच आणि संबंधित व्यक्ती शनिवारी (दि. 16) नाशिक येथील पोस्ट कार्यालयाच्या मुख्यालयात आली असता, तेथील कर्मचारी व अधिकार्‍यांनी दिव्यांग व्यक्तीच्या पायाच्या अंगठ्याचा ठसा घेऊन आधारकार्ड नोंदवून घेतले. त्यामुळे त्या व्यक्तीने पोस्ट कार्यालयाबाबत समाधान व्यक्त करीत आभार मानले.

हेही वाचा :

Back to top button