देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, २४ तासांत २,१८३ नवे रुग्ण, २१४ मृत्यू | पुढारी

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ, २४ तासांत २,१८३ नवे रुग्ण, २१४ मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे २,१८३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २१४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ११,५४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दिवसभरात १,९८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

याआधीच्या २३ तासांत कोरोनाचे १,१५० रुग्ण आढळून आले होते. त्यात आता वाढ झाली आहे. दिल्लीत शनिवारी ४६१ रुग्णांची नोंद झाली होती. यामुळे कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ५.३३ टक्क्यांवर गेला आहे. तर दिल्लीत शनिवारी २४ तासांत दोन लोकांचा मृत्यू झाला होता. दिल्लीत शुक्रवारी ३६६ रुग्ण आढळून आले होते. त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

देशातील कोरोनामुक्तीदर ९८.७६ टक्के आहे. दर रोजचा पॉझिटिव्हिटी रेट ०.८३ टक्के ए‍वढा आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.३२ टक्के आहे. आतापर्यंत ८३.२१ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर गेल्या २४ तासांत २ लाख ६१ हजार ४४० चाचण्या करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील आतापर्यंत १८६ कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Back to top button