नाशिक : उन्हाळ कांद्याच्या दरात दोनशे रुपयांची घसरण | पुढारी

नाशिक : उन्हाळ कांद्याच्या दरात दोनशे रुपयांची घसरण

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
मार्चअखेरच्या तीन दिवसांच्या सुटीनंतर शनिवारी (दि.2) लासलगाव बाजार समितीत कामकाज पूर्ववत सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी उन्हाळ व लाल कांद्याची अंदाजे 17 हजार क्विंटल आवक झाली. पहिल्याच दिवशी 29 तारखेच्या तुलनेत उन्हाळ कांदा दरात सरासरी 200 रुपयांची घसरण झाली. तर लाल कांद्यात सरासरी 100 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.

लासलगाव बाजार समितीत उन्हाळा व लाल कांद्याची 17 हजार क्विंटल आवक होऊन उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान 500, कमाल 1,252 तर सरासरी भाव 1,000 रुपये प्रतिक्विंटल राहिले. तर लाल कांद्याचे बाजारभाव किमान 400, कमाल 903 तर सरासरी भाव 700 रुपये होते. हंगामाच्या सुरुवातीला असलेला विक्रमी दर जास्त काळ टिकला नाही. अवघ्या दोन महिन्यांत 2,500 ते 3,000 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होणारा कांदा आता कमीतकमी 300 ते 600 रुपये प्रतिक्विंटलवर आला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या स्वप्नावर पाणी फेरले असून, शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

हेही वाचा :

Back to top button