शरद पवार : भूमिगत होऊन उगवणारे राज ठाकरे ३ ते ४ महिन्यातून एकदा लेक्चर देतात | पुढारी

शरद पवार : भूमिगत होऊन उगवणारे राज ठाकरे ३ ते ४ महिन्यातून एकदा लेक्चर देतात

कोल्हापूर ; पुढारी ऑनलाईन : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल गुढी पाडव्यानिमित्त मेळावा घेतला. यामध्ये राज यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर जोरदार टीका केली. यावर शरद पवार यांनी त्यांना प्रत्त्यूत्तर देत त्यांचा चांगलाच समाचार घेतला. मागच्या काही वर्षातील राष्ट्रवादी पक्षाची माहीती राज ठाकरेंनी तपासावी, राज ठाकरे ३ ते ४ महिने भूमिगत होतात आणि एखादा दिवस येत लेक्चर देतात अशा शब्दात पवार यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली.

राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला पवार जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला होता. यावर पवार म्हणाले की, मागच्या काही वर्षातील राष्ट्रवादीची माहीती राज ठाकरेंनी तपासावे, राज ठाकरे ३ ते ४ भूमिगत होतात आणि एखादे दिवस येत लेक्चर देतात. यामुळे राज ठाकरे यांच्या बोलण्यात तथ्य नाही असे पवार म्हणाले. जनता राज ठाकरे आणि मनसेला प्रतिसाद देत नसल्याचा टोला त्यांनी लगावला. मनसेचा आकडा हाताच्या बोटावर मोजण्याच्या पुढे जात नाही असेही ते म्हणाले.

पेट्रोल डिझेलच्या किंमती पूर्वी वाढत होत्या, पण भाजप सत्तेत आल्यापासून रोज तेलाच्या किंमती वाढतात. रोज वाढणाऱ्या तेलामुळे सामान्यांच्या खिशावर मोठा परिणाम होत असतो. वाढत्या इंढन दरवाढीमुळे घरगुती वापरापासून सगळ्याच जीवनावश्यक गोष्टींची महागाई वाढत आहे. आज सामाजीत ऐक्य संकटात येईल अशी भूमिका या सरकारने घेतली आहे. आपण भारतीय आहोत ही भावना रुजण्याची गरज सध्या आहे. देशाची प्रतिमा डागाळेल अशी वागणूक सत्तेत असणाऱ्या भाजपकडून होत आहे.

Back to top button