नाशिक : अवकाळीच्या तडाक्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू, द्राक्षबाग भूईसपाट | पुढारी

नाशिक : अवकाळीच्या तडाक्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू, द्राक्षबाग भूईसपाट

नाशिक : (दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील ओझे येथे सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडल्यामुळे ओझे येथील समाधान पठाडे या शेतक-याची अडीच एकर द्राक्षबाग भूईसपाट झाली आहे. अवकाळीच्या तडाक्याने शेतक-याचे मोठे नुकसान झाले आहे.

त्याचप्रमाणे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या गहू, हरबरा, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा प्रथामिक अंदाज शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे. या अवकाळी व बेमोसमी पावसाने काढणीला आलेल्या व पेपर लावलेल्या निर्यातक्षम द्राक्षबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. पेपर मध्ये असणा-या द्राक्षबागेत पाऊस पडल्यास द्राक्ष मण्यांना तडे जावून संपूर्ण द्राक्षबागांना क्रकिंगची मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे ज्या परिसरात पाऊस झाला त्या ठिकाणीच्या द्राक्षबागांचे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे.

नेहमीप्रमाणे चालू वर्षीही अवकाळी व बेमोसमी पावसाने बळीराजाला मोठा फटका दिल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. लाखोरुपये खर्च करुन द्राक्षबागांचे नुकसान होत असेल तर आता द्राक्षउत्पादकांनी द्राक्ष पिक घ्यावे की नाही असा प्रश्न द्राक्षउत्पादकांना पडला आहे. शासनाने लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामी करावे अशी मागणी द्राक्ष उत्पादकांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button