कर्कश आवाज करणारी वाहने आवडणारे विक्षिप्तच!

कर्कश आवाज करणारी वाहने आवडणारे विक्षिप्तच!
Published on
Updated on

न्यूयॉर्क : दिवसाढवळ्याच नव्हे तर रात्री-अपरात्री, लोकांच्या झोपेचे खोबरे करीत किंवा रुग्ण लोकांच्या छातीत धडकी भरवत अत्यंत कर्कश आवाज करीत वाहने दामटणारे काही तरुण गावोगावी पाहायला मिळतातच. असा गोंगाट करीत लोकांचे येनकेन प्रकारे लक्ष वेधून घेत 'धूम' स्टाईल दुचाकी गाड्या पळवणारी तरुणाई ही सभ्य समाजासाठी चिंतेचा विषय बनलेली आहे. काही वेळा तर फटाक्यांसारखा आवाज काढणार्‍या दुचाकीही पळवल्या जात असतात. अशा प्रकारचा आवाज वाहनचालकाला का आवडत असेल, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. आता याबाबत परदेशात एक संशोधनच झाले असून त्यानुसार अशी वाहने आवडणारे लोक 'सनकी' किंवा 'विक्षिप्त'च (सायको) असतात हे सिद्ध झाले आहे!

ओंटारियोमधील वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या प्रा. ज्युली एटकेन शेर्मर यांनी असा गोंगाट करणार्‍या गाड्या आवडणार्‍या लोकांची मानसिकता तपासली. आपल्या पाळीव कुत्र्याला कॅम्पसजवळ फिरवत असताना त्यांना या विषयावर संशोधन करण्याची कल्पना सुचली होती. त्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले की, ज्या लोकांना मोठ्या आवाजात गाड्या पळवणे आवडते, त्यांना इतरांना त्रास देण्यात आनंद वाटतो आणि ते खरोखरच विक्षिप्त स्वभावाचे असतात! अन्य लोकांना त्रास देणे ज्यांना आवडते त्यांना हा एक प्रकारचा मानसिक विकारच असतो यात शंकाच नाही.

प्रा. शेर्मर यांनी केलेल्या सर्वेक्षणात 529 तरुणांनी भाग घेतला. त्यापैकी 52 टक्के पुरुष होते. या लोकांना कार आणि दुचाकी गाडीच्या इंजिनचा मोठा आवाज आणि मफलर (इंजिनचा आवाज कमी करणारा भाग) बदलण्याची क्षमता यासंबंधी प्रश्न विचारण्यात आले. यासोबतच सहभागी लोकांच्या व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी शॉर्ट डार्क टेट्राड (एसडी4) प्रश्नही विचारण्यात आले. यामध्ये इतरांना त्रास देण्याची मानसिकता असणार्‍या प्रश्नांचा समावेश होता. ज्या लोकांना आपल्या कारच्या इंजिनचे मफलर बदलायचे आहे, त्यांचा असा स्वभाव भविष्यात असू शकतो, असेही या सर्वेक्षणात स्पष्ट झाले. तसेच ज्या लोकांना मोठ्या आवाजात गाड्या पळवण्याची आवड आहे, ते इतरांना त्रास देण्यात आनंद घेतात आणि विक्षिप्त असतात, असे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news