अकोला : ‘महाबीज’मध्ये बोगस भरती ; ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई | पुढारी

अकोला : 'महाबीज'मध्ये बोगस भरती ; ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई

अकोला: पुढारी वृत्तसेवा
खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर महाबीजमध्ये नोकरी मिळवणाऱ्या अधिकारी कर्मचार्‍यांवर महाबीजने कठोर कारवाई केली आहे. सर्वोच्च न्यायालय निकालाच्या आधारावर महाबीज प्रशासनाने विविध पदावर कार्यरत असणाऱ्या एकूण ११ अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करून त्यांना पदावरून काढले आहे.

यामध्ये नागपूर येथील जिल्हा व्यवस्थापक गणेश महादेव चिरुटकर, गडेगाव (जि. भंडारा) येथिल कनिष्ठ प्रशासन सहाय्यक भीमराव मारोतराव हेडाऊ,  शिवनी (जि. अकोला) येथील कनिष्ठ प्रशासन सहाय्यक एम. एन. गावंडे,  हिंगोली केंद्र व्यवस्थापक राजेंद्र जुनघरे, परभणी येथील श्री घावट, जालना येथील शिपाई अजापसिंग घुसिंगे यासह एकुण ११ अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. रविवारी (दि.3) कार्यालयीन आदेशाद्वारे महाबीजने खोटे प्रमाणपत्र देऊन नोकरी बळकावणाऱ्यांना पदावरून बरखास्त केले आहे.

महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी संघटनेने केला घोटाळा उघड

बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर महाबीजमध्ये नोकरी मिळवल्याची बाब महाबीज प्रशासनाला माहित झाल्यावर महाबीज प्रशासनाने अनेक वर्ष कुठल्याही प्रकारची ठोस अथवा दंडात्मक कारवाई केली नव्हती. परंतु नागपूरमधील महाबीज बहुजन कर्मचारी अधिकारी संघटनेचे निवेदन आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकालामुळे महाबीज प्रशासनाला कारवाई करणे भाग पडले.

त्यांच्याकडून पैसे वसूल करा :  राजेश भगत

बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून शासनाची दिशाभूल करणा-या अधिकारी व कर्मचा-याकडून व्याजासह पैसे वसूल करावे. रिक्त झालेल्या जागेवर लवकरात लवकर नवीन पदभरती करून आदिवासी प्रवर्गातील उमेदवारांना न्याय द्यावा, अशी मागणी महाबीजचे माजी केंद्र अभियंता तथा अकोला येथील सामाजिक कार्यकर्ता राजेश भगत यांनी केली आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button