नाशिक : चोरट्यास वर्षभर सश्रम कारावास | पुढारी

नाशिक : चोरट्यास वर्षभर सश्रम कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर शिवारातील शिवाजीनगर येथील निगळ पार्क परिसराजवळील साईदीप अपार्टमेंट येथे चोरी करणार्‍यास न्यायालयाने वर्षभर सश्रम कारावास व अडीच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंगेश संजय मधे (20, रा. पिंपळगाव बहुला, सातपूर) असे या चोरट्याचे नाव आहे.

ऑक्टोबर 2019 मध्ये चोरट्याने चोरी करून सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मंगेश मधेसह इतर चौघांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक सचिन विश्वनाथ शेंडकर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे फिरोज शेख यांनी युक्तिवाद केला. मंगेश विरोधात चोरी केल्याचे पुरावे मिळाल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एम. गादिया यांनी त्यास शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार व्ही. पी. पाटील, महिला अंमलदार बी. कापडणीस यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

Back to top button