Lok Sabha Election 2024 : भाजपकडून सर्वाधिक महिला उमेदवार निवडणूक रिंगणात | पुढारी

Lok Sabha Election 2024 : भाजपकडून सर्वाधिक महिला उमेदवार निवडणूक रिंगणात

लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील निवडणुकीमध्ये बहुतांश राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारी देण्यामध्ये अनास्था दाखविल्याचे पुढे आले आहे. दोन टप्प्यात फक्त आठ टक्के महिलांना तिकीट देण्यात आले आहे. तथापि, दोन्ही टप्प्यामध्ये भाजपने सर्वाधिक 69 महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केल्याचे चित्र आहे.

  • पहिल्या टप्प्यात एकूण उमेदवार 1625 होते. त्यामध्ये 135 महिला उमेदवारांचा समावेश होता.
  • दुसर्‍या टप्प्यातील एकूण उमेदवारांची संख्या 1198 असून, त्यामध्ये महिला उमेदवारांची संख्या 100 आहे.
  • पहिल्या टप्प्यामध्ये तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 76 महिला उमेदवारांना तिकीट देण्यात आले. तर दुसर्‍या टप्प्यात केरळमधील सर्वाधिक 24 महिलांना उमेदवारी देण्यात आली.
  • पहिल्या दोन टप्प्यातील निवडणुकीमध्ये काँग्रेसने 44, तर भाजपने 69 महिला उमेदवारांना तिकीट दिले आहे.
    दोन्ही टप्प्यात एकूण 235 महिला उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली.

तिसर्‍या टप्प्यात 123 महिलांना तिकीट

लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात 1352 उमेदवार निवडणूक रिगणात असणार आहेत. यामध्ये 123 महिला उमेदवार असल्याची माहिती असोासिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या(एडीआर) अहवालात दिली आहे. तिसर्‍या टप्प्यातील निवडणुकीत एकूण उमेदवारांच्या तुलनेत महिला उमेदवारांचे प्रमाण नऊ टक्के असणार आहे.

Back to top button