एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे असे सांगत अजित पवारांकडून राज्यपालांची थेट मोदींकडे तक्रार ! | पुढारी

एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे असे सांगत अजित पवारांकडून राज्यपालांची थेट मोदींकडे तक्रार !

पुणे; पुढारी ऑनलाईन : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार यांनी सणसणीत टोला लगावला आहे.

महत्वाच्या पदांवर असणारे व्यक्ती अनावश्यक वक्तव्य करत आहेत. यामुळे अनावश्यक गोष्टी घडत आहेत. राज्यातील कोणत्याही व्यक्तीला हे पटणारे नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणे कधीही महाराष्ट्राला हे सहन होणार नाही. मी हे कोणताही संकूचित विचार न ठेवता बोलत आहे. पुण्याचा विकास करण्यासाठी कोणतेही राजकारण आडवे न आणता आपल्याला काम करायचे आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पुण्यात मेट्रो सुरू होण्यास १२ वर्षे लागली. पुणेकरांना मागच्या काही वर्षात मेट्रो तयार होण्यास त्रास झाला. पुणे ते पिंपरी चिचवड लवकरात लवकर मेट्रो व्हावी अशी माझी विनंती आहे. तसेच पुण्यातील मुख्य नद्या असणाऱ्या मुळा आणि मुठा नद्या सुशोभिकरण होणे गरजेचे आहे. नदी पात्रातील पाण्याचे स्त्रोत पर्यावरणाला कोणताही धोका न होता याचे काम करावे लागेल. पुण्यातील नद्यांना पूर नियंत्रण रेषेचा विचार करून नद्यांचे नुतनीकरण व्हावे असे अजित पवार म्हणाले.

हे ही वाचलं का ?

Back to top button