नाशिक : सावानाची 13 मार्चला वार्षिक सर्वसाधारण सभा | पुढारी

नाशिक : सावानाची 13 मार्चला वार्षिक सर्वसाधारण सभा

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क :  १८१ वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. १३ मार्च, २०२२ रोजी सकाळी १०.०० वा. संस्थेचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते यांच्या अध्यक्षखाली संस्थेच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे होणार आहे.

सन २०१९-२० व सन २०२०-२१ या दोन वर्षाची एकत्रित सभा होणार आहे. दोन वर्षे कोविडमुळे लांबलेली सभा तसेच काही सभासदांचा आग्रह होता की, सदर सभा ऑनलाईन नको ऑफलाईन घावी त्यानुसार सदर सभेचे आयोजन करण्याल आले आहे. सदर सभेत सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर, सहा. सचिव डॉ. शंकर बोऱ्हाडे, अर्थ सचिव उदयकुमार मुंगी यांनी केले आहे.

सभेपुढील विषय –
१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२) सन २०१९-२० व सन २०२०-२१ सालच्या अहवालास मंजुरी देणे.
३) सन २०१९-२० व सन २०२०-२१ चा लेखापरीक्षण अहवाल तसेच ताळेबंद, जमा खर्च चर्चा करून मंजूर करणे.
४) सन २०२१-२२ व सन २०२२-२३ चे अंदाजपत्रक मंजुर करणे.
५) सन २०२२-२३ सालासाठी अंतर्गत हिशेब तपासनीस यांची निवड करणे.
६) सन २०२२-२३ सालासाठी सनदी लेखापाल यांची निवड करणे.
७) म.अध्यक्षाच्या परवानगीने आयत्या वेळचे विषय.

टीप – १) सदरची सभा गणसंख्येच्या अभावी तहकुब झाल्यास सभा त्याच दिवशी त्या ठिकाणी अर्धा तासानंतर म्हणजेच सकाळी १०.३० वा. भरेल तिला गणसंख्येची आवश्यकता राहणार नाही.
२) संस्थेचा अहवाल, जमा-खर्च वाचनालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे. (सुटीचे दिवस सोडून)
३) काही प्रश्न असल्यास सभेपूर्वी तीन दिवस अगोदर लेखी स्वरूपात आल्यास सभेत घेतले जातील. अन्य विषयावर विचार होणार नाही.

हेही वाचा :

Back to top button