औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मराठा समाजबांधवांमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याच्यांविरोधात संतापाची लाट उसळली आहे, राज्यपालांनी माफी मागावी अन्यथा त्यांचे धोतर फेडू असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनी सोमवारी ( दि.२८) रोजी दिला आहे.
औरंगाबाद येथील कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनी संपात व्यक्त केला. यावेळी त्यांनी पदावर आहात, ज्येष्ठ आहात म्हणून मुलाहिजा करतो. छत्रपती शिवरायांबद्दल भावना, संवेदना नसतील, तर त्याविषयी बोलताना जरा सांभाळा. नको त्या विषयात नाक खुपसू नका आपले छत्रपतींविषयीचे खरे विचार आपसूक बाहेर आले आहेत. आपलं वय आणि वक्तव्य बघता तुम्हाला निवृत्तीची गरज आहे, असे ते म्हणाले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी आवाहन करतो की, तात्काळ राज्यपालांची उचलबांगडी करावी व छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा आम्ही सर्व शिवभक्त आपले धोतर फेडण्यास मागेपुढे पाहणार नाही. हा इशारा समजा! असे विनोद पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचलंत का?